Saturday, October 1, 2011

कुणाला जाणीव ही नसते , कुणासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ
नये म्हणून , एक फुलपाखरू बागेबाहेरच
फिरते , ... किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते , आपल्यावरून च
विचार करावा , समोरच्याला ही मन असते ..

Saturday, August 27, 2011

हक्क मलाही आहे......

तू असशील तुझ्या जगात सुखी
इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी
ओंजळीत समेटून अश्रू सारे
तुलाच त्याचे अर्घ्य देतो मी..

तुला कळेलच, उशिरा का होईना
माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी
दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास
पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी..

कधी कधी उगाच वाटतं मला
काय पाहिलं होतं मी तुझ्यात
तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य
तेव्हापासूनच होतं तळ्यात-मळ्यात..

इतकं सारं सोसून, पाहूनही
मी माझ्या नशिबावर थक्क आहे
दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची
पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे ...!!!!!..

Saturday, July 23, 2011

मनात नसताना...... :(

मनात नसताना कुणाला तरी ,


कधी तरी दुखावावे लागते ?

उत्तर माहित नसलेल्या प्रश्नांना कधी तरी समोरे जावे लागते ?

मनात नसताना कुणाला तरी

कधी तरी विसरावे लागते ?

वाट माहित नसलेल्या वाटसरुला ,

मिळेल त्या वाटेने जावेच लागते ?

फांदीच्या मनात नसताना , फुलाला फांदीवरुन पडावेच लागते ?

अगदी खरं सांगू का ?

माणसाच्या मनात नसताना ,

कधी तरी या जगातून त्याला जावे लागते ........................

Monday, July 11, 2011

प्रेमामध्ये असे नाही

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही
जीव जेवढ़ा आपण लावावा
 तेवढ़े सर्व लावतात असे नाही
प्रेमा सारखे बंधन ज्याला सीमा नसतात हे जाणतो
पण प्रेमासारख्या बंधनाला
 सर्वच जाणतात असे नाही


कुणीतरी म्ह्टलय प्रेमामध्ये
 हातावरील रेशांनाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात्....
पण त्या वाटा बद्लेपर्यंत सर्वच थांबतात असे नाही..

Friday, July 8, 2011

कुणाच्या इतक्या जवळ.....

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे...........

म्हणून आपण लिहाव......

कोणाला तरी आवडाव
म्हणून काहीतरी लिहाव
विचार सोबतीला घेऊन
शब्दांना कवितेत गुंफ़ाव

कोणाला तरी आवडाव
म्हणून काहीतरी लिहाव
कोणाच्या तरी मनात
त्या शब्दांना अलगद ठेवाव

कोणी तरी वाचाव
म्हणून आपण लिहाव
कल्पनेच्या सागरात
मनसोक्त पोहाव

कोणी काहीच म्हणत नाही
तरीही आपण लिहाव
कोण काही म्हणतय का
हे गुपचुप जाऊन पहाव

कोणालाच आवडत नाही
म्हणून लिहिण का सोडाव
प्रयत्न करत असतांना
पुन्हा पुन्हा खोडाव

कोणाला तरी आवडाव म्हणून
शब्दांशी आपण खेळाव
एकच ईच्छा आहे मनात
वाचणार्‍याला मन आपल कळाव....