Tuesday, July 14, 2009

टपरी

टपरी
टपरी....

सन्ध्याकाळची वेळ,
सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही,
फ़टक्या भीन्ति,
दोन चार तुटक्या बाकडी,

अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो....

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,


ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर
प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर
अस्वाद घेतले कधि केकचे,

इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे...!

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,

पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले...


वेळ बदलला काळ बदलला,
मीत्रान्चा आता साथ सुटला,


मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले, टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे... !!

Sunday, July 12, 2009

Life is a prison

Life is a prison,
No one to listen,

To hear when you shout.
If you fall it don't matter,
There's no one to care.

Watching freedom is painful,
For those locked away.
Seeing joy, love and happiness,
Another price that you pay.
Hide the pain,
Carry on ,
Routine is the key.

Don't let on that you're not,
that you're pretending to be....

Monday, July 6, 2009

जस्स च्या तस्स

जस्स च्या तस्स राहील का सारं….?
जस्स च्या तस्स राहील का सारं….?

हाक नुसती ऐकून थांबेल का वारं…….?

धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे.?
रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न ….काय हे?


सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप,

ती दिड रुपया भाड्याची सायकल,
ब्रेकडांस व मूनवॉक करनारा तो मायकल…

पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग.....?
अणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग…?

आवडती छ्त्री हरवेल का परत..?
मोडतील का बेत आल्यावर ठरत..?

शाळेतली मैत्रीण परत मारेल का हाक..?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक…?

ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट..?
आउट झालो कारण चांगली नव्हती बॅट..?

होईल का टिव्ही - “ब्लॅक ऍन्ड व्हाईट” चा “कलर”..?
पाहिल्यावर एकदम चोरेल का ती नजर…?

“Ice-cream” ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं…?
मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं..?

जस्स च्या तस्स राहील का सारं….? हाक नुसती ऐकून थांबेल का वारं..?

जस्स च्या तस्स राहील का सारं….
जस्स च्या तस्स राहील का सारं….....