Wednesday, June 17, 2009

खुप आठवतात ते दिवस…



आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण

तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले
की डोळ्यात टचकन् पाणि येतं………


जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........


डोळ्यातून अश्रू ओघळला,
की तोही आपला राहत नाही.
वाईट याचंच वाटतं की,
दुःख त्याच्या सोबत वाहत नाही....

No comments:

Post a Comment